बी पी ( बालक पालक )
- प्राची प्रविण आंधळकर.
शाळेत शिकत असताना जस जसे मोठ होत जातो तास तसे लैगिकतेचे महत्त्व कळू लागते. त्या बद्दलची जाणीव वाढू लागते. ती करण्याची ओढ वाढत राहते. पण प्रत्येक उत्सुकतेचे उत्तर मिळतेच असे नाही. सायन्स च्या या लैगिक धडा तर सगळ्यांची जिज्ञासा टिकवण्याचा मार्ग ठरतो. आपल्याला पडलेले सगळे प्रश्न शिक्षकांना विचारून मोकळे होतो. वयात आल्यावर येणारे सगळेच आकर्षण खरी वाटू लागतात. त्याच्या प्रत्येक बाबी जाणून घेण्याची धडपड सुरु होते. ती जाणीव आठवी ते दहावी मधल्या प्रयेक विद्यार्थ्याला होते. म्हणून शाळेतर्फे लैगिक माहिती देणाऱ्या डॉक्टराना बोलावण्यात येते. यातून खूप योग्य माहिती बालका पर्यंत पोहचते. सेक्स एज्यूकेशन ची ओढ पुढे जाऊन खूप धोकादायक हि ठरते.लैंगिक शिक्षण मानवी लैंगिक अवयव, प्रजनन, लैंगिक गतिविधी किंवा रक्त लैंगिक आरोग्य, प्रजनन हक्क आणि लैंगिक वर्तन संबंधित चिंता शिक्षण संबंधित व्यापक संकल्पना आहे. पालक आणि, मित्र, चर्च, शालेय अभ्यासक्रमात, सार्वजनिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम इ लैंगिक शिक्षण प्रमुख साधन आहे.
२००५ मध्ये किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम भारतीय सरकारने सुरू करण्यात आली. शिक्षक, मुले, पालक आणि धोरण निर्मात्यांना आक्षेप. २००७ मध्ये कार्यक्रम कठोरपणे मर्यादित होती. राजस्थान, गुजरात, केरळ नंतर लैंगिक शिक्षण वेगळी आवृत्ती सेट होता.
शाळेत अभ्यासक्रम मध्ये लैंगिक शिक्षण, समलैंगिकता, योन शिक्षण सर्वात मोठा वाद न जोडता दिला आहे. समलिंगी स्त्री-पुरुष, महिला सारखे आणि नीट लैंगिक शिक्षण दिले पाहिजे .सध्या विविध शाळा अभ्यासक्रम समलिंगी संकल्पनेचा समावेश नाही.
पाठ्यक्रम म्हणून या कडे न पाहता मुलांच्या भविष्याचा योग्य मार्गदर्शन शिक्षकांनी केले पाहिजे. हि काळाची गरज आहे. त्यांना जर आधीच याची माहिती असेल तर त्यांच्या वर होणारा अन्याय ते सहन करणार नाहीत. आणि योग्य पद्धतीने त्याचा वापर भविष्यात करतील. यासाठीच लैगीक शिक्षण हे शाळे मधून देणे खूप आवश्यक्य आहे.
- प्राची प्रविण आंधळकर. MACJ

No comments:
Post a Comment