Sunday, October 4, 2015

मला सगळेच मिळून फसवतात...

                            मला सगळेच मिळून फसवतात...

                                                                                                                      - प्राची प्रवीण आंधळकर.  

              गोरखपूर जवळ च्या एका गावातल्या वस्तीत आमचं कुटुंब होतं. माझे बाबा साधारण २४ वर्षाचे होते तेव्हा देवाघरी गेले. माझी आई तेव्हा जेमतेम २० वर्षाची होती. ती सुद्धा अशिक्षित होती. तिला लिहता हि येत नव्हते. त्यावेळेस आमच्या चौघा जणांच्या कुटुंबातला आधार स्तंभ म्हणजे फक्त बाबाचं होते. बाबा गेल्यावर आई गावात धुणीभांडी करू लागली. मी हि मोठी होत होते. बाबा गेले तेव्हा मी फक्त सहा वर्षाची होते. आणि मला अजून एक लहान भाऊ आहे. मी शाळेत जाऊ लागले आणि आईला जशी होईल तशी मदत करू लागले. काही वर्ष आमचं ह्याच परिस्थितीत घर चालू होत. मी आता सातवी मध्ये शिकत होती. ऑगस्ट महिना चालू होता. आईला सारखा ताप येऊ लागला त्यामुळे तिच्या कडून कोणतीच काम होत नव्हती. मी तिच्या जागी काम करायला जाऊ लागली. पण लहान मुलगी म्हणून मला लोक कमी पगार देऊ लागले. माझ्या आईची तब्येत खूपच खालवली. दवाखान्याला सुद्धा पैसे आमच्याकडे नव्हते. म्हणून माझ्या शेजारच्या काकांनी शहरात जाऊन काम करण्याचे सुचविले. तिथे मला माझ्या कामाचे योग्य पैसे हि मिळतील या आशेने मी त्या काकांना सोबत घेण गोरखपूर ला त्यांच्या मित्राच्या घरी जायचे ठरले. इकडे भावाला सांभाळायला माझ्या गावातल्या मैत्रिणीला सांगितले. आणि आम्ही गोरखपूर च्या दिशेने निघालो.
                  मी लहान पणापासून त्या काकांबरोबर खेळायचे, त्यामुळे आमच्या घरच्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. मला काका त्यांच्या मित्राच्या घरी घेऊन आले. त्यांनी मला रस्त्यात जात असताना बजावले होते, ' ते काका तुला जे सांगेल ते करायचं, नाही म्हणायचं नाही. कधी ओरडले तर ओरडा सहन करायचा पण तक्रार कोणाजवळ हि करायची नाही. त्या काकांकडे तुला खूप मैत्रिणी भेटतील पण त्यांच्या सोबत खेळत बसायचं नाही, निपुतपणे स्वतःचे काम करायचे.' अशा सगळ्या सूचना मला काकांनी देऊन ठेवल्या होत्या. 
                 आम्ही गोरखपूरला पोहचलो. काकांचे नाव अहमद होते. त्यांचा खूप मोठा वाडा होता. आणि सगळीकडे नटल्या थाटलेल्या मुली होत्या. मी मनात ठरवलं होतं. इथे खूप मनापासून मिळेल ते काम करणार. काका आणि मी अहमद काकांच्या घरी पोहचलो. तिथे पाच- सात काकांचे मित्र बसले होते. आणि त्यांच्या अगदी पाठी एक खिडकी होती त्या खिडकी मध्ये खूप मुली वाकून वाकून बघत होत्या आणि काहीतरी पुटपुटत होत्या. काकांनी मला डान्स करायला सांगितले. मी डान्स केला. ते पाहून अहमद काका म्हणाले, ' इथे एक डान्स शिक्षिका येतात त्यांच्या कडून डान्स शिकून घे. खूप नाजूक आणि सुंदर दिसतेस तू.' तिकडे जमलेल्या सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या. आणि काही तरी पुटपुटू लागले. कवळी आहे पोर, सगळं शिकवावं लागेल, अशा गप्पा मारू लागले. त्यातील एक काका म्हणाले मला हीच पाहिजे. आणि त्यांनी त्याच्या खिशातून पैश्याचे बंडल काढले आणि माझ्या काकांना दिले. मला म्हणाले आज पासून तू माझ्या सोबत तू राहणार. तुला हवंय ते तू बिनधास्त करू शकते. आणि मला घेऊन एका रूम वर गेले. तिथे पहिले त्यांनी मला एक गोळी दिली आणि ते बाहेर निघून गेले. मला कसा तरी होतंय. हे समजण्याच्या आत काका खूप वाईट अवस्थेत खोली मध्ये आले. आणि त्यांनी माझ्या बरोबर अतिप्रसंग केला. मी खूप रडले ओरडले पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दररोज माझ्या बरोबर असाच घडू लागलं. मी तिथून पळण्याचा खूप प्रयत्न केला. पण असफल ठरले.
                   एक दिवशी एक दादा माझ्या खोलीवर आले. त्यांना मी खूप विनवणी केली कि इथून मला सोडवा. काही वेळाने त्यांनी मान्य केलं. आणि पुढच्याच आठवड्यात ते मला घेऊन जायला आले. त्यांनी मला घरचा पत्ता विचारला. मी सगळं सांगितलं. आम्ही बस पकडली आणि गावाकडे निघू लागलो. वाटेत त्या दादा चा मित्र त्याला भेटला. दादाने मला सांगितले कि आता हा तुला घरी सोडेल. आणि पुढच्या दिशेने निघालो. रात्र झाली होती म्हणून आम्ही एका हॉटेल वर थांबलो. तिथे त्याने माझ्यावर अतिप्रसंग आणला. मी खूप घाबरली, तिथून निसटण्याचा मार्ग नव्हता कारण ते हॉटेल मुख्य  रस्त्या पासून ४ किमी लांब होते. दुसर्या दिवशी आम्ही गोरखपूरला पोहचलो त्याने मला दुसऱ्याला विकले. त्याने तीन दिवसाने तिसऱ्याला विकले मला खूप त्रास होऊ लागला होता. मी तिथे एक बातमी वाचली १०९८ बदल ची. लहान मुलांनी अडचण जाणवल्यावर लगेच फोन करा असा लिहला होता. मी संधी साधून त्यांची मदत घेण्याचे ठरवले आणि आज त्यांच्या मुळे मी या तस्करी पासून लांब आहे.
आज मी अनेक मुलीना या तस्करी पासून दूर करण्याचा प्रयत्न करतेय. 

(कथा ख्यातनाम हिंदी साहित्य लिह्णाऱ्या एका लेखिकेची आहे.)
                                                                                                              - प्राची प्रवीण आंधळकर.  
                                                                                                                 MACJ

No comments:

Post a Comment