बाल सुधार गृहाचे गुन्हेकरण
- प्राची प्रविण आंधळकर
''( शाळेत जाणारी मुले आहेत. ज्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. काही कॉलेज ची मुले त्यांना छोटी मोठी कामे देतात)'ए रवि, जा रे त्या तुझ्या शाळेजवळच्या पानपट्टीवाल्याला हि पुडी नेउन दे. मी तुला खाऊचे पैसे देतो.' रवि दप्तरामधून ती पुडी घेऊन जातो. संध्याकाळी तो दादा त्याला १० रुपये देतो, तो खुश होतो. आणि मग पुढचे कित्येक महिने रवि अशा भरपूर पुड्या घेऊन जातो. आणि वेगवेगळ्या पानवाल्यांच्या दुकानात जाऊन देतो. आणि त्याचा मोबदला घेत असतो. त्याला माहित हि नसते कि त्या पिशव्या मध्ये काय असते. तो फक्त देण्याचे काम करतो. एकदा पोलिसांना खबर मिळते आणि ते त्याच्या शाळे जवळ पहारा देऊन उभे असतात. दोन- चार दिवस झाल्यावर त्या पोलिसांच्या लक्षात येते कि हा मुलगा काहीतरी घेऊन जातोय. त्यामुळे ते त्याला येउन भेटतात. त्याची चौकशी करतात. तो सगळे खर खरे सांगून टाकतो. आणि खूप मोठ्या दृग्स रॅकेट ला पकडून देण्यात मदत करतो. पण स्वतःहि त्याचा शिकार होतो. ''
असे अनेक किस्से देशभरात होत असतात. त्यामध्ये अनेक मुले दररोज अडकतात. आणि त्याची हकालपट्टी बाल सुधार गृहात होते. काही वेळा हि मुले त्या पुड्या कुतूहलाने खोलून बघतात आणि त्याचे सेवन करतात. आणि दृग्स चे शिकार बनतात. आणि या दृग्स रॅकेट चा भाग बनतात. त्यामुळे आपल्या अधिनियमामुळे ते हि बाल सुधार गृहात जातात.
काही वेळा छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये स्वतः सहभागी होतात आणि गुन्हे करतात. ते गुन्हे परत त्यांच्या कडून होऊ नये किंवा असे मोठे गुन्हे होऊ नये म्हणून त्यांना हि बाल सुधार गृहात पाठवतात. काही जन छोट्या चोरी मारी करून पकडले जातात. ते हि याच बाल सुधार गृहात जातात.
जर गुन्हे वेगवेगळे आहेत तर सुधार गृह तरी एकाच पद्धतीच का ?
अशा वेळी केलेल्या पाहणी नुसार हेच सिद्ध झालंय कि बाल सुधार गृहात जाऊन तो निरागस मुलगा मोठ मोठे गुन्हे करणारा गुंड म्हणून बाहेर पडतो. त्यांच्या संगतीत राहून गुन्हे जगतातील खूप मोठ्या कारवायांचा स्वतः भाग बनण्याचे स्वप्न हि पाहतो. त्याच्या त्या सुधार गृहातील मित्रांकडून आपले ज्ञान एकमेकांना देत सुटतो. अशी अनेक गुन्हात्मक उपक्रम दरवर्षी येणाऱ्या बालकांमध्ये दिसून येतात. त्यामध्ये त्यांचा एक मोहरका असतो. जो त्यांना गुन्ह्याची दिशा दाखवतो. तर हे असे बाल सुधार गृह काय कामाचे ज्यातून वाईट गुन्हेगारी प्रवृत्ती बाहेर पडते. खर तर या सुधार गृहमधून देशाचे हितकारक बनून बाहेर पडले पाहिजे पण चुकीच्या गोष्टी मुळे या सुधार गृहाची परिस्थिती बिघडत चालली आहे.
- प्राची प्रविण आंधळकर. MACJ
No comments:
Post a Comment