Sunday, October 4, 2015

लखलखीत दुनियेचा मुखवटा...

  लखलखीत दुनियेचा मुखवटा...                 

                                                                                                                              - प्राची प्रवीण आंधळकर. 


 रजत            -   ' हे मॉम, व्हॉट अप्स!!! मॉमम.. मला आज खेळायला जायचं. आपण शूट वरून
                          लवकर निघूया ना.. प्लीज?'
रजत ची आई  -  ' अरे असं काय करतोस आज आपल्याला पार्टी ला जायचं आहे. टुडे नॉट पोसिबल सन,
                          नेस्क टाइम.'
रजत             -   ' मॉम उद्या पासून माझ्या एक्झाम आहेत. मग खूप अभ्यास करावा लागेल, प्लीज
                           आज तूच जा ना पार्टी ला, मला खेळायचं आहे.'
रजत ची आई  -  ' ह्या पार्टी मध्ये खूप कास्टिंग काउज वाले असतील त्यातूनच तुला तुझ्या करिअर
                         मधला  नेस्क ब्रेक मिळेल. तुला आज यायलाच हवं'
रजत             -   ' मॉम माझ्या कडे खूप काम पेंडिंग आहेत अजून आपण ती संपत आल्यावर बघू ना,
                        पुढच्या गोष्टी, पण आता मला खेळायचं आहे.'

                   असे सवांद आपल्यासाठी काही नवीन नाहीत. आपल्याकडे सिनेमा तयार होऊ लागला तेव्हा पासून सिनेमात बाल कलाकार काम करू लागले. कधी छोट्या मोठ्या भूमिकेत तर कधी त्यांच्यावरच सिनेमे बनू लागले. कधी मुलांच्या विश्वातील काल्पनिकतेला घेऊन तर काही वेळा वास्तवाशी जोडले जाऊन या मुलांवर चित्रपट बनू लागले. आजचा एक असा काळ आहे ज्यामध्ये कुठल्याही ठिकाणी जा म्हणजे टीव्ही घ्या किंवा चित्रपट अनेक लहान मुले त्यातून काम करतच असतात. नंदिता सेन, अमोल गुप्ते, आमिर खान, कबीर खान यांनी आजच्या काळातल्या घडणाऱ्या परिस्थिती वर दृष्टीक्षेप टाकून खूप आग-वेगळे विषय हाताळले. पण या काळात हि मुलांनी किती तास सेट वर काम करायचे याचे अधिनियम आहेतच आणि त्याचा योग्य असे आचरण या चित्रपट सृष्टीतले लोक करतात. पण खरच ते नियम पुरेसे आहेत का ? असा खडा सवाल अनेक वेळा न्यायालयात विचारण्यात आला आहे.

त्यातील काही नियमावर टाकलेला हा दृष्टीक्षेप : -
१. ज्या सेट वर वयाच्या ५ वर्षाच्या आतील मुले काम करत आहे. त्या मुलासोबत त्याच्या कुटुंबातील एक
    व्यक्ती सेट वर सतत त्यांच्या सोबत असेल.
२. ५ वर्षाखालील मुलांना ३ तासा पेक्षा अधिक वेळ काम करावयास लाऊ नये.
३. १२ वर्षापर्यंत असलेली मुले ६ ते ८ तास काम करू शकतात. पण त्यांची योग्य देखभाल सेट वर घेतली  
     पाहिजे. त्यांच्या सोबत हि पालक असायला हवेत.
४. सेट वर खेळी मेळीचे वातावरण ठाव्ने अनिवार्य आहे.
५. सेट वर लहान मुलांच्या सुरक्षेची यंत्रणा असावी. तसेच एक पूर्ण वेळ डॉक्टर असायला हवं.

लेख 5: पालक अधिकार.
कलम 6: जीवन मिळण्याचा अधिकार आहे.
कलम 13: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलाच्या अधिकार आहे.
कलम 18: पालक किंवा कायदेशीर पालक मुलाच्या संगोपन प्राथमिक जबाबदारी आहे.
कलम 23: मानसिक किंवा शारीरिक अक्षम आहेत ज्यांना मुले राज्य अधीन आहे.                                          
कलम 27: मुलाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक विकास पुरेसा राहणीमान मुलांचा अधिकार आहे.


           या नियमांचे अनेक वेळा उलंघन झाले आहेत. आणि त्याच्यासाठी अनेकांना शिक्षा हि झाल्या आहेत. पण हे नियम तर बाल कामगारांच्या कामा विषयाचे आहेत. त्यांच्या मानसिकतेच काय? त्यांना खूप वेळा सेट वर कंटाळा येतो, दिवस भर सेट वर घालवल्यामुळे ते आपल्या आवडी निवडी खूप कमी प्रमाणात जोपासतात. त्यांना त्यांच्या आवडी नुसार काहीही करता येत नाही. कित्येकदा तर त्यांना कामच करायचं नसतं पण आई वडिलांच्या इच्छे खातर ते काम करतात. अशाने त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहते आणि त्यांना या गोष्टी चा मानसिक त्रास होऊ लागतो.

                                                                                                               - प्राची प्रवीण आंधळकर.  MACJ

No comments:

Post a Comment