Sunday, October 4, 2015

माझी सुरक्षा नक्की कोण करणार?

                     

माझी सुरक्षा नक्की कोण करणार?

   - प्राची प्रविण आंधळकर. 

           
         आजच्या २१ व्या शतकातही मुलांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य माहित नाही. आपल्या देशाच्या नियमांनुसार वयाच्या १८ वर्षापर्यंत बालकाची संपूर्ण जबाबदारी पालक आणि सरकारची असते. पण आज हि विविध लेखामध्ये असेच दिसून येते कि मुलाची तस्करी होते. त्यांच्या हातून चुकीचे गुन्हे घडवून आणले जातात. त्यांना नियम मोडून काम करण्यासाठी काही वेळा समाज भाग पडतो. अशा वेळी समाजाला चोख प्रतीउत्तर म्हणून भारत सरकारचे मुलांच्या सुरक्षेला घेऊन अधिक सक्त असे नियम आहेत.

संरक्षण पात्र मुले खालील मुलांचे संरक्षण मुद्दे आणि श्रेणी काही मांडले आहेत :-
  • लिंग भेदभाव.
  • भेदभाव जात.
  • अपंगत्व.
  • स्त्री.
  • हत्या.
  • घरगुती हिंसा.
  • बाल लैंगिक शोषण.
  • बाल विवाह.
  • बाल कामगार.
  • बाल वेश्याव्यवसाय.
  • बाल तस्करी.
  • बाल यज्ञ केला.
  • शाळेतील शारिरीक शिक्षा.
  • परीक्षा सक्ती व विद्यार्थ्यांच्या आत्महत्या.
  • नैसर्गिक संकटे.
  • युद्ध आणि संघर्ष.
  • एचआयव्ही / एड्स.

             या अशा गोष्टी आहेत ज्यातून मुलांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम होतो. आज लहान वयात खूप संकटांचा त्यांना सामना करावा लागतो त्यामुले समाजाच्या वाईट प्रवृत्तींना आळा बसेल आणि मुलांचे योग्य पोषण हि होईल याच साठी संरक्षणाची गरज आजच्या मुलांना पडत आहेत. तरी हि या प्रवृतीला आज हि आळा बसला नाही आहे.
            भारतामध्ये आजही समाज खूप वाईट परंपरांना घेऊन जगतो आहे. मुलगा - मुलगी चा समलिंगी भेदभाव असो, धार्मिकतेच्या आधारे अंधश्रद्धा असो, किंवा धर्माच्या आधारे केलेली पिळवणूक असो, प्रत्येक उदाहरणामध्ये क्रूर मानसिकतेचा जन्म होतो आणि हेच भारताच्या भविष्यासाठी घातक ठरते. म्हणून बालक हक्क मंजूर करावे लागतात.
            कुपोषण हा खूप मोठा प्रश्न आजच्या सरकार समोर मांडला गेला आहे. आज हि भारतामध्ये अनेक मुले हि उपसमारामुळे मरतात. त्यासाठी भारत सरकार आंगणवाडी उपक्रमाद्वारे प्रत्येक घरातील बालकाला पोषक जेवण मिळेल यासाठी प्रयत्न करते. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सगळ्या बालकांना शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे.
             या सगळ्या संरक्षणाचे कितीहि नियम असले किंवा त्यावर केलेल्या उपाय योजना असतील त्या योग्य परीने आजही मुलांपर्यंत पोहचत नाहीत. देशातील भ्रष्टाचार यासाठी कारणीभूत ठरतो. आणि आज देशाला स्वातंत्र्य होऊन इतके वर्ष होऊन हि आज देशातील भविष्य पिढी सुरक्षित नाही.

                                                                                      - प्राची प्रविण आंधळकर.  MACJ

No comments:

Post a Comment